गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूविषयीच्या दाव्यानंतर पंकजा मुंडेंचा रक्तदाब वाढला

0
5535

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याची माहिती होती. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा अमेरिकस्थित हॅकर सय्यद शुजा यांने केला आहे. यावर मुंडे यांच्या कन्या व राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी त्यांचा रक्तदाब वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

याबाबत मुंडे कुटुंबियांकडून अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया  देण्यात आलेली नाही. पंकजा मुंडे  आज (मंगळवार)  मंत्रिमंडळ बैठकीला देखील गैरहजर राहिल्या आहेत.  प्रकृती ठीक नसल्याने मुंडे बैठकीला गैरहजर राहिल्याचे सांगितले जात आहे.  हॅकर सईद शूजा याच्या दाव्यानंतर पंकजा मुंडे यांचा रक्तदाब वाढल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची केंद्रीय गुप्तचर यंत्रणे ( रॉ )मार्फत चौकशी  करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व  विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. आता या प्रकरणावर पंकजा मुंडे कोणती प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.