Maharashtra

गोपीनाथ मुंडेंचा अपघात नव्हे, घातपात ?; धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

By PCB Author

February 06, 2019

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन होऊच शकत नाही,  असे राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी  म्हटले आहे.गोपीनाथ मुंडेंचा अपघात नाही तर घातपात होता असा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंडे यांच्या मृत्यूवरुन आरोप प्रत्यारोपांची राळ उठू लागली आहे. त्यातच आता धनंजय मुंडे यांनी खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे या प्रकऱणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की,  गोपीनाथ मुंडे माझे काका होते. आमचे रक्ताचे नाते होते. सीबीआयचा अहवाल आला त्यात हा अपघात असल्याचे समोर आले. त्यामुळे तो मान्य करणे साहजिक आहे. पण गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचे समाधान झाले नाही, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

दरम्यान, माझ्या बापाला काही झाले असेल, तर मी त्याचा जीव घेईन मला कोणत्याही तपास यंत्रणेची गरज नाही, असे वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.