गोपीचंद पडळकर यांच्यावर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी

0
540

मुंबई, दि, २१ (पीसीबी) – वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून आज (दि,२१) बैठक झाली. यावेळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. तसेच पक्षाचा विस्तार वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये गोपीचंद पडळकर यांची पक्षाच्या प्रमुख सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी सांगली लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती. यात त्यांनी ३,००,२३४ मते मिळवत सांगलीतील लढत रंगतदार बनवली होती. परंतु येथून भाजपच्या संजय काका पाटील यांनी विजय मिळवला होता. पडळकर यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना पक्षाच्या प्रमुख सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी आता वाढली आहे. सांगलीसह त्यांना आता महाराष्ट्रातील इतर भागातही काम करून त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करावा लागणार आहे. त्यामुळे ते यापुढे कसे काम करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आजच्या बैठकीत गोपीचंद पडळकर यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये शंकरराव लिंगे, धनराज वंजारी, अँड विजय मोरे असे तीन उपाध्यक्ष नेमण्यात आले आहेत. तर राजाराम पाटील, सचिन माळी, अनिल जाधव, नवनाथ पडळकर यासोबत इतर ६ जण सरचिटणीसपदी निवड केली आहे.