गोडाऊनचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला; एवढ्या ‘लाखांचा’ माल चोरीला

0
158

चिखली, दि. १७ (पीसीबी) – गोडाऊनचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी 17 लाख 67 हजारांचा माल चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 16) शेलारवस्ती. चिखली येथे श्रेया इंटरप्राईजेस नावाच्या कंपनीच्या गोडाउनमध्ये उघडकीस आली.

गजानन दिनकर जाधव (वय 38, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शेलारवस्ती चिखली येथे श्रेया इंटरप्राईजेस नावाच्या कंपनीचे गोडाऊन आहे. मंगळवारी (दि. 15) रात्री आठ ते बुधवारी सकाळी सहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनच्या पत्र्याचे गेट समोरील बाजूने उचकटले. त्यावाटे आत प्रवेश करून सहा हजार 801 किलो वजनाचे स्टेनलेस स्टीलचे 17 लाख 67 हजार 477 रुपये किमतीचे बार चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.