गोडसे यांना हिंदू दशतवादी म्हणाऱ्या कमल हसन यांना अटकपूर्व जामीन मंजूर

0
332

मद्रास, दि. २० (पीसीबी) – मक्कल निधी मय्यमचे नेते कमल हासन यांना मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दशतवादी होता, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कमल हासन यांचे संपूर्ण भाषण विचारात घेऊन तसेच ते एका नोंदणीकृत राजकीय पक्षाचे नेते असल्याने त्यांचा न्या. बी. पुगालेंधी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्याचबरोबर पुढील पंधरा दिवसात हासन यांनी करुर येथील कोर्टात हजेरी लावण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. यादरम्यान, हासन यांनी कोर्टाला सांगितले की, आपण केवळ गोडसेबाबत हे विधान केले होते ते सर्व हिंदूसाठी नव्हते.