गेल्या ५०० वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होतो; आज ही अपेक्षा पूर्ण होत आहे – एकनाथ खडसे

0
225

जळगाव,दि.०५(पीसीबी) – राम जन्मोत्सव हा आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे. गेल्या ५०० वर्षांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. आज ही अपेक्षा पूर्ण होत आहे, असं भाजप नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कारसेवेच्या आठवणींना उजाळा दिला.

राम मंदिराच्या आंदोलनामध्ये मी देखील सहभागी होतो. त्यात अनेकांनी बलिदान दिले. त्यात सर्वांचे योगदान आहे. आज त्या सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या. राम मंदिराच्या आंदोलनासाठी मी देखील 15 दिवस जेलमध्ये काढले. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली.

दरम्यान, अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला.