गेल्या २४ तासात देशात कोरोनारुग्णांच्या संख्येत ‘धक्कादायक’ वाढ; ‘एवढ्या’ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

0
243

कोरोना संसर्गवाढी मध्ये भारत सर्वात पुढे.

नवी दिल्ली,दि.२२(पीसीबी) : दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनाबळींची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत भारतातील कोरोना बाधितांची संख्या ५६ लाखांच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या २४ तासात संपूर्ण भारतात ७५ हजारांच्या वर नवीन कोरोनारुग्ण आढळले आहे. त्यातील १०५३ जणांचा मृत्यू झाला असेल, कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ५५ लाखांच्या वर गेली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्रालायच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

संपूर्ण जगामध्ये कोरोनाचा हाहाकार चालू आहे. मात्र जगातील इतर देशांच्या तुलनेत कोरोनाच्या संसर्गात भारत वेगाने पुढे जात असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे कि, गेल्या मागील तीन दिवसांत ९०,००० रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. समोर आलेल्या या तीन दिवसांच्या आकडेवारीसमोर भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे.