Notifications

गेल्या दोन निवडणुकीत मावळ आणि शिरूरमधील मतदारांचा सत्तेच्या विरोधात कौल; २०१९ चा कौल कुणाला?

By PCB Author

May 22, 2019

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – देशात पुन्हा एकदा भाजप व मित्र पक्षांनाच बहुमत मिळण्याचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होणाऱ्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या ह्दयाचे ठोके वाढले आहेत. मावळ आणि शिरूर मतदारसंघातील मतदारांचा कौल कुणाला असेल, याची उत्सुकता आहे. गेल्या दोन निवडणुकीत मावळ आणि शिरूर मतदारसंघात सत्तेच्या विरोधात जनतेने कौल दिल्याचा इतिहास आहे.