Maharashtra

गृहमंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे. अन् त्यांनी त्वरीत राजीनामा देणे आवश्यक आहे- चंद्रकांत पाटील

By PCB Author

April 10, 2020

मुंबई,दि.१०(पीसीबी) – एवढा मोठा प्रकार होऊनही गृहमंत्र्यांना माहिती कसं नाही. त्यामुळे त्यांचीच चौकशी झाली पाहिजे. अन् त्यांनी त्वरीत राजीनामा देणे आवश्यक आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

गृह विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने उद्योगपती वाधवान यांना लॉकडाऊनच्या काळात फिरण्यासाठी पत्र दिल्याने गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून असे पत्र देणे हे अशक्य आहे. गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच दोषी अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, पॅरोलवर बाहेर असलेले कोट्यावधींच्या घोटाळ्याचे आरोपी DHFL समुहाचे वाधवान कुटुंबीयांना CBI च्या ताब्यात देण्याऐवजी राष्ट्रवादीकडे असलेल्या महाराष्ट्राच्या गृहखात्यानी त्यांना विशेष सवलत दिली, अशी टीका त्यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केली आहे.