Notifications

गृहमंत्री राजनाथ सिंहांविरोधात समाजवादी पक्षाची शत्रुघ्न सिन्हाची पत्नी पूनम सिन्हांना उमेदवारी

By PCB Author

April 16, 2019

लखनऊ, दि. १६ (पीसीबी) – काँग्रेस नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला असून सपाने त्यांना लखनऊ मतदारसंघातून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. पूनम यांच्या उमेदवारीची लगेचच घोषणा करण्यात आली. सपा नेता डिंपल यादव यांच्या उपस्थितीत पूनम सिन्हा यांनी आज सपाचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं. त्यानंतर सपाचे ज्येष्ठ नेते रविदास मेहरोत्रा यांनी पूनम यांची उमेदवारी जाहीर करतानाच राजनाथ सिंह यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने लखनऊमधून उमेदवार देऊ नये, असे आवाहन केले.