गृहनिर्माण सोसायट्यांच्या मनमानीला सरकराचा चाप

0
377

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – घर कामगार व वाहन चालक यांना प्रवेश प्रतिबंधित न करण्याबाबत सहकार विभागाने एक पत्रक जारी केलं आहे. लॉकडाउनच्या काळात अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश बंदी केल्याने वयोवृद्ध रहिवासी आणि घर कामगारांचे हाल होत होते. मात्र आता सहकार विभागाने सोसायटीच्या आवारात या श्रमिक वर्गाला प्रवेश बंदी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावे आणि मनमानी नियम करु नये अशा स्पष्ट सूचनाही गृहनिर्माण संस्थांना देण्यात आल्या आहेत.

टाळेबंदी शिथिल होत असतानाच राज्य आणि केंद्र शासनाने वृत्तपत्र वितरण आणि घरकामगार यांच्यासह घरांच्या डागडुजीची कामं करणारे मजूर यांना संमती दिली होती. असं असूनही मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील अनेक गृहनिर्माण संस्थानी मनमानी सुरु ठेवली.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात गृहनिर्माण संस्थांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणीही सोयीस्करपणे केली जात होती. तसंच अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेते आणि घरकाम करणाऱ्या कामगारांना मज्जाव करत आहेत. मात्र आता शासनाने दिलेल्या नव्या आदेशानुसार हे गृहनिर्माण संस्थांना करता येणार नाही.

पत्रकात शासनाने काय म्हटलंय?
लॉकडाउनच्या काळात अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश बंदी केल्याने वयोवृद्ध रहिवासी आणि घर कामगारांचे हाल होत होते. मात्र आता सहकार विभागाने सोसायटीच्या आवारात या श्रमिक वर्गाला प्रवेश बंदी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावे आणि मनमानी नियम करु नये अशा स्पष्ट सूचनाही गृहनिर्माण संस्थांना देण्यात आल्या आहेत.