गुलटेकडी येथे संतप्त जमावाने ठेकेदाराच्या कार्यालयाची केली तोडफोड; एकाला जबर मारहाण

0
661

पुणे, दि. ३० (पीसीबी) – गुलटेकडी इंदिरानगर गल्ली क्रमांक २ येथे भर रस्त्यात झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली. याचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी ठेकेदाराच्या कार्यालयाची तोडफोड केली. तसेच ठेकेदाराच्या एका कर्मचाऱ्याला जबर मारहाण करुन ३ दुचाकी आणि कार्यालयाची तोडफोड केली आहे.

या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सेवन लव चौकपासून मार्केटयार्डकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, ठेकेदाराला बोलवा तरच झाड काढू देऊ, असे म्हणत स्थानिकांनी झाड काढण्यास विरोध केला आहे.