गुरुवारी 587 जणांना कोरोना,तब्बल 11 मृत्यू

0
384

पिंपरी, दि. 9 (पीसीबी): पिंपरी-चिंचवड शहरातील 568 आणि शहराबाहेरील 19 अशा 587 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहेत. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 172 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आजपर्यंतची रुग्णसंख्या 6061 वर पोहोचली आहे.

आज एकाचदिवशी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. चिंचवड येथील 48 वर्षीय महिला, काळेवाडीतील 50 वर्षीय महिला, आकुर्डीतील 63 वर्षीय पुरुष, रहाटणीतील 62 वर्षीय वृद्ध, गांधीनगर येथील 38 वर्षीय महिला, पिंपरी येथील 51 वर्षीय व 59 वर्षीय पुरुष, आकुर्डीतील 70 वर्षीय वृद्ध, इंदुरीतील 65 वर्षीय पुरुष, पुण्यातील 65 वर्षीय महिला आणि विठ्ठलवाडीतील 67 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे.

शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्या सहा हजार पार झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे प्रमाण होण्याचे प्रमाणही जास्त आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
आज उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 172 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3681 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

शहरात आजपर्यंत 6061 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 3681 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
शहरातील 83 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 36 अशा 119 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2265 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.