गुरुवारी शिवसेना व वाळके प्रतिष्ठानच्या वतीने महायज्ञ रक्तदान शिबीराचे आयोजन

0
214

– दिघी प्रभाग 4 मधिल 27 जुलै 2021 रोजी जन्मणा-या प्रत्येक बालकांस 5555 रुपये सप्रेम भेट देणार…..संतोष तानाजी वाळके

पिपंरी , दि. 26 (पीसीबी) – राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना दिघी शाखा आणि कै. तानाजी सोपानराव वाळके व कै. सुजाता एकनाथ वाळके प्रतिष्ठान यांच्या वतीने गुरुवारी (दि. 29 जुलै) महायज्ञ रक्तदान शिबीराचे आयोजन आणि शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक युवा शिवसैनिक संतोष तानाजी वाळके यांनी प्रसिध्दीस दिली आहे. या शिबीरात 1001 बाटल्या रक्त संकलित करण्याचा संकल्प आहे. तसेच सहभागी होणा-या प्रत्येक रक्तदात्यांस हेल्मेट, दहा लिटर पाण्याचा जार किंवा स्पिकर फोन यापैकी एक वस्तू भेट देण्यात येणार आहे.

तसेच एकूण रक्तदात्यांमध्ये लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यातील पाच भाग्यवान विजेत्यांना एलसीडी टिव्ही, फ्रीज, मिक्सर, टेबल फॅन, ओव्हन बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. दिघी प्रभाग 4 मधिल 27 जुलै 2021 रोजी जन्मणा-या प्रत्येक बालकांस 5555 रुपयांची मुदत ठेव योजनेची पावती मान्यवरांच्या हस्ते सप्रेम भेट देण्यात येणार आहे. अशीही माहिती आयोजक संतोष तानाजी वाळके यांनी दिले आहे.  छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, कोकण मराठा संघ काटे, वस्ती दिघी, पुणे – 15 येथे सकाळी 9 वाजता शिबीराचे उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या हस्ते होणार आहे. समारोप सायंकाळी 5 वाजता शिवसेना उपनेते, विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर, शिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच यावेळी शिवेसना पुणे जिल्हा प्रमुख विजय देशमुख, शिवसेना सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, भोसरी विधान सभा प्रमुख धनंजय आल्हाट, माजी जिल्हा प्रमुख राम गावडे, भोसरी विधानसभा उपशहर प्रमुख ॲड. कुणाल तापकीर, युवा शिवसेना अधिकारी विश्वजीत बारणे, उपशहर प्रमुख शैलेश मोरे, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा संघटक आबा लांडगे, उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी, माजी शहरप्रमुख महादेव गव्हाणे, भोसरी विधानसभा संघटक रावसाहेब थोरात, शिवसेना उपशहर प्रमुख राहूल गवळी, भोसरी विधानसभा संघटक तुषार सहाणे, युवा सेना जिल्हाधिकारी सुरज लांडगे, भोसरी विधानसभा संघटक दादा नरळे आणि सचिन सानप, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अशोक वाळके आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रक शिवसैनिक कृष्णा वाळके, ज्ञानेश्वर आण्णा वाळके, भाऊसाहेब काटे, अविनाश लोणारे, कैलास कुदळे, मनोज परांडे, प्रियशील पोटभरे, कैलास तापकीर, सागर रहाणे, गौरव असरे आदी आहेत.