गुरुपौर्णिमे निमित्त सकाळपासून देवदर्शनासाठी मंदिरात भावीकांची गर्दी

0
420

चिंचवड, दि,१६ (पीसीबी) – गुरु ब्रम्हा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वर:, गुरु साक्षात परमब्रम्ह, तस्मै श्री गुरुवे नम: ! आषाढ़ शुद्ध पौर्णिमा म्हणजे महान गुरु महर्षी व्यास यांचा जन्मदिवस. गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा या पवित्र दिनाच्या दिवशी शिष्याने गुरु चे दर्शन घेतले व गुरूने शिष्याला भावी आयुष्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले.

गुरुपौर्णिमे निमित्त चिंचवड  लिंकरोड  येथील बाकावूल्फ कॉलनीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात भावीकांची देवदर्शनासाठी सकाळ पासून गर्दी पहायला मिळाली.