गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी देशात राजेशाही गरजेची – खासदार उद्यनराजे

0
554

सातारा,  दि. २६ (पीसीबी) – देशातील गुन्हेगारी  आणि  देशद्रोह्यांना चाप लावण्यासाठी लोकशाहीऐवजी राजेशाहीची  गरज आहे. भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढू लागल्याने हे लोकशाहीचे अपयश मानावे लागेल, असे मत साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उद्यनराजे भोसले यांनी आज (सोमवार) येथे केले. देशातून दहशतवादाला हद्दपार करणे, हीच हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.   

केडंबे (ता.जावली) येथे आज मुंबई दहशतवादी हल्ल्यांत हुतात्मा झालेले सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात उदयनराजे बोलत होते. ओंबळे यांच्या स्मारकासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

उदयनराजे पुढे म्हणाले की,  क्रुरकर्मा दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडून देऊन पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचे काम केडंबेचे सुपुत्र हुतात्मा तुकाराम ओंबळे यांनी केले आहे. त्यांचे हे बलिदान व्यर्थ न जाऊ देऊ नका.  दहशतवादाला देशातून हद्दपार करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उदयनराजे म्हणाले.