गुड न्यूज… लस तयार करण्यात यश मिळत आहे

0
579

नवी दिल्ली, दि.२९ (पीसीबी) : कोरोना विषाणूच्या संसर्गावर लस तयार करण्यासाठी देशात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामाला यश येत असल्याची माहिती नीती समितीचे सदस्य (आरोग्य) डॉ. वी. के. पॉल यांनी दिली. देशात आठ प्रकारच्या वॅक्सीन वर खासगी प्रगोयशाळेत तर, सहा प्रकारच्या वॅक्सीनवर सरकारी प्रयोगशाळेत काम सुरू असल्याचे ते म्हणाले. मात्र, लस तयार झाली तरी लोकांपर्यंत लगेच पोहचणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. पॉल यांनी सांगितले की, कोरोना वॅक्सीन वर खासगी संस्था आणि कंपनी काम करत आहेत. यामधील चार वॅक्सीन वर चांगल्या प्रकारे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर, सरकारी प्रयोगशाळेत सुरू असलेल्या दोन-तीन वॅक्सीनचे काम बरेच पुढे गेले आहे. मात्र, या वॅक्सीनवर कोणत्या स्टेजमध्ये काम सुरू आहे, याची माहिती त्यांनी दिली नाही. कोरोना औषधांवरही काम सुरू असल्याचे डॉ. पोल यांनी सांगितले. या स्वेदशी औषधांचा वापर कोरोना महामारी विरोधात होणार असल्याचे ते म्हणाले.

अनेक औषधांवर प्रयोग सुरू
ज्या औषधांवर काम सुरू आहे, त्यात आणि हाइड्रोक्सी क्लोरोक्विन (HCQ) यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अन्य काही औषधांवर प्रयोग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यात प्लाझ्मा थेरपीचा समावेश आहे. मात्र, वॅक्सीन तयार झाल्यानंतर ती लगेच लोकांपर्यंत पोहचेल की नाही, हे लगेच सांगणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले. जगाच्या तुलनेत भारतात वॅक्सीन तयार करण्याची क्षमता जास्त असल्याचे सरकारचे मुख्य शास्त्रज्ञ सल्लागार प्रो. के. विजय राघवन यांनी सांगितले आहे. सध्याची परिस्थिती पाहात लवकर लस तयार होणे गरजेचे असल्याचे राघवन म्हणाले.

तोपर्यंत सोशल डिस्टन्स पाळा
कोरोना महामारी पाहता यावर अनेक प्रकारच्या वॅक्सीनची आवश्यता असल्याचे त्यांनी सांगितले. याला मोठा खर्च येणार आहे. देशात जवळपास 30 संस्था कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे राघवन यांनी सांगितले. यात मोठ्या कंपन्यांपासून अगदी स्टार्टअप कंपन्यांचाही समावेश आहे. तर, काही कंपन्यांनी विदेशी कंपन्यांसोबत हातमिळवणी केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जोपर्यंत यावर लस अथवा औषध येत नाही तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता पाळून या आजाराला दूर ठेवावे लागेल, असा सल्लाही राघवन यांनी दिला.