गुड न्यूज – देशातील कोरोना रिकव्हरी रेट ५८ टक्के

0
266

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ५८ टक्के झाले आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. एवढंच नाही तर सध्याच्या घडीला साधारणतः देशभरातले तीन लाख रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा ३ टक्के आहे, जे अत्यल्प आहे असंही हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. तसंच रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा १९ दिवसांवर पोहचला आहे. लॉकडाउनच्या आधी हे प्रमाण ३ दिवसांवर होते अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

भारतात सध्याच्या घडीला ५ लाख ८ हजार ९५३ कोरोना रुग्ण आहेत. यापैकी २ लाख ९५ हजार ८८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १ लाख ९७ हजार ३८७ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. आत्तापर्यंत कोरोनाची लागण होऊन देशभरात १५ हजार ६०० वर मृत्यू झाले आहेत.

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वेगाने वाढते आहे. ही बाब भारतासाठी चांगलीच आहे. मागील २४ तासांमध्ये कोरोनाचे १० हजार २४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ३ लाखांच्या आसपास रुग्ण देशभरात बरे झाले आहेत अशीही माहितीही हर्षवर्धन यांनी दिली.