‘गुडफ्रायडेला घराबाहेर न पडता, घरीच प्रार्थना करावी. घरातच रहा, सुरक्षित रहा,’ – उपमुख्यमंत्री

0
337

 

पुणे, दि.१० (पीसीबी) – देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. करोना बाधितांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर घराबाहेर न पडता, घरीच प्रार्थना करावी. घरातचं रहा, सुरक्षित रहा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

तसेच याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, ‘ मानवजातीच्या कल्याणासाठी भगवान येशूंनी प्राणांचे बलिदान दिले. त्यांनी केलेला त्याग आणि दिलेले विचार मानवजातीचे सदैव कल्याण करत राहतील. कोरोनामुळे मानवजात संकटात असताना भगवान येशूंचा विचार, सेवाकार्याचा संदेशच आपल्याला वाचवणार आहे,’ असे देखील पवार म्हणाले.

गुडफ्रायडेच्या निमित्ताने भगवान येशूंच्या प्रेम, त्याग, दया, क्षमा, शांतीसारख्या उदात्त विचारांचे, मानवसेवेच्या कार्याचे स्मरण करण्याची आवश्यकता उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली आहे. असे वृत्त सामना’ने प्रसिद्ध केले आहे.

‘गुडफ्रायडेला घराबाहेर न पडता, घरीच प्रार्थना करावी. घरातच रहा, सुरक्षित रहा,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे.