गुडन्यूज… केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतीसाठी 700 कोटींची मदत जाहीर

0
210

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) : पावसाने हाहाकार माजवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं आहे. अशावेळी केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतीसाठी 700 कोटींची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्राला देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती दिली. पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्राने 700 कोटी रुपये मंजूर केले आहेत, असं तोमर यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 701 कोटी रुपये मंजूर
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही मदत जाहीर केली आहे. नरेंद्र सिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत 701 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना ही मदत पीक विमा योजनेअंतर्गत ही मदत दिली जाईल, असं नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.

महाराष्ट्र सरकारच्या माहितीच्या आधारे अहवाल, शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर
महाराष्ट्र सरकारनं नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जी माहिती केंद्राला दिली गेली. केंद्रानं आतंर मंत्रालयीन समिती बनवली, समितीनं राज्यातील अधिकाऱ्यासोबत दौरा केला. तो दौरा केल्यानंतर अहवाल गृहमंत्र्यांना देण्यात आला. तो अहवाल मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रासाठी 701 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाल्याचं नरेंद्र तोमर म्हणाले आहेत.