गुटखा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

0
232

आळंदी, दि. २५ (पीसीबी) – विक्री करण्याच्या उद्देशाने गुटखा बाळगल्याप्रकरणी एकाला आळंदी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 23) रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास आळंदी मधील पीएमटी चौकात करण्यात आली.

ईश्वर बाळशीराम मेदगे (वय 33, रा. हनुमानवाडी, केळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विकास पालवे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्‍वर याने विक्रीसाठी गुटखा बाळगला असल्याची माहिती आळंदी पोलिसांना मिळाली. आळंदी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पीएमटी चौकात सापळा लावून पोलिसांनी कारवाई केली. आरोपीकडून 19 हजार 760 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी जप्त केला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.