Desh

गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर…! “या” दोन टप्प्यात होणार मतदान

By PCB Author

November 03, 2022

गुजरात,दि.०३(पीसीबी) – गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यावेळची लढत केवळ भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणार नाहीये, तर दिल्ली आणि पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या आपनेही गुजरातच्या आखाड्यात उडी घेतलीय. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘होम ग्राऊंड’वर यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (३ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम – दुसरा टप्पा

दुसरा टप्पा निवडणूक कार्यक्रम –

नोटिफिकेशन – १० नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज अंतिम तारीख – १७ नोव्हेंबर

अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – २१ नोव्हेंबर

मतदान – ५ डिसेंबर

दोन्ही टप्प्यांची मतमोजणी आणि निकाल – ८ डिसेंबर