Desh

गुगल मॅपवर पब्लिक टॉयलेटही शोधता येणार

By PCB Author

July 19, 2019

नवी दिल्ली, दि, १९ (पीसीबी) – एखादा रस्ता चुकलात किंवा एखादा पत्ता शोधायचा असेल, तर आपण हमखास गुगल मॅपचा उपयोग करतो. गुगल मॅपमुळे कोणतेही ठिकाण शोधण्यास सहजसोपे झाले आहे. एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यास गुगल मॅपमध्ये तूम्ही पत्ता, चित्रपट गृह, स्टेशन, मॉल यासारख्या अनेक गोष्टी शोधता. गुगलने आपल्या ‘गुगल मॅप’ या अॅपमध्ये नवीन नेव्हिगेशन फीचर्स आणले आहे.

गुगल मॅपच्या साह्याने आता तुम्हाला सार्वजनिक शौचालय शोधता येणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत गुगलने तब्बल ४५ हजार कम्युनिटी आणि सार्वजनिक शौचालये गुगल मॅप्सवर अॅड केली आहेत. हे फीचर आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही डिव्हाइसवर उपलब्ध असेल.

मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता यासारथ्या देशभरातील १७०० शहरांमधील सार्वजनिक शौचालयाची माहिती गुगल मॅपवर अॅड केली आहे. गुगल मॅप या अॅपवर ‘पब्लिक टॉयलेट्स नीयर मी’ या नावाने हे फीचर असेल. दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी गुगलने आणखी एक नवीन फीचर आणले आहे. यूजर्सना बाइक-शेअरिंग स्टेशनची माहिती दिली जाणार आहे.