गुगल भारतात ७५ हजार कोटी गुंतवणार

0
169

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : गुगलने भारतात 10 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 75 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूमुळे देशावर आर्थिक संकट आलं आहे, अशा परिस्थितीत गुगलने भारतात इतक्या मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या डिजीटल भारताचं स्वप्न साकारण्यात मदत होईल, असे गुगलने सांगितले आहे.

सुंदर पिचाई आणि मोदींची व्हर्च्युअल बैठक
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यात चर्चा झाली. यावेळी वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबतची माहिती दिली. “आम्ही शेती, तरुण आणि व्यापाऱ्यांचं जीवन बदलण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल चर्चा केली”, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

गुगल फॉर इंडिया च्या वार्षिक कार्यक्रम आज व्हर्च्युअली आयोजित करण्यात आला. कोरोनाविषाणूमुळे हा कार्यक्रम वर्चुअली घेण्यात येत आहे. या कार्यक्रमात गुगल आणि अल्फाबेट चे सीईओ सुंदर पिचाई उपस्थित होते.