Desh

गुगलने मला दोनदा नाकारल्याने फ्लिपकार्ट उभे राहिले- बिनी बन्सल

By PCB Author

August 10, 2018

बंगळुरू, दि. १० (पीसीबी) – गुगलने आपल्याला एकदा नाही तर दोनदा नाकारले म्हणूनच आपण फ्लिपकार्टचे विश्व उभे करू शकलो अशी भावना ऑनलाइन शॉपिंग पोर्टल ‘फ्लिपकार्ट’चे संस्थापक बिन बन्सल यांनी व्यक्त केली आहे. ते बेंगळुरूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

बिनी बन्सल हे आयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत. आयआयटी दिल्लीतून पदवी मिळवल्यानंतर ते सारकॉफ या कंपनीत रूजू झाले होते. सारकॉफमध्ये त्यांची कामगिरी अत्यंत चांगली असल्याने त्यांनी दोनदा गुगलमध्ये नोकरी मिळविण्याकरिता सीव्ही पाठवला होता. पण दोन्हीदा गुगलने त्यांचा सीव्ही नाकारला होता. त्यांच्या मेलला कधीच गुगलने सकारात्मक उत्तर दिले नव्हते. ‘गुगलमध्ये तेव्हा नोकरी मिळाली असती तर मी फ्लिपकार्टचा विचारही कधी केला नसता’ अशी भावना बन्सल यांनी व्यक्त केली आहे.

पुढे बन्सल यांना अमेझॉनमध्ये नोकरी मिळाली जी त्यांनी आठच महिन्यात सोडली. अमेझॉनमधील त्यांचे सहकारी सचिन बन्सल यांच्यासोबत त्यांनी फ्लिपकार्ट ही वेबसाइट सुरू केली. ही वेबसाइट आता देशातील आघाडीची शॉपिंग वेबसाइट ठरली आहे. नुकताच वॉलमार्ट या बहुराष्ट्रीय कंपनीने फ्लिपकार्टसोबत एक महत्त्वपूर्ण करारही केला ज्यामुळे फ्लिपकार्ट आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे.