गुंड अजय काळभोर टोळीतील एका जणाकडून दोन गावठी पिस्तूल व चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई गुंडा स्क्वाड उत्तर विभाग गुन्हे शाखेकडून करण्यात आली.

दत्ता विठ्ठल आगलावे ( वय २५ ,रा.तुकाराम नगर ,वाल्हेकवाडी ) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे असा एकूण ६१ हजार २०० रुपयांच्या ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसात खून, कट रचणे, दरोड्याचा प्रयत्न तसेच गावठी कट्टे जवळ बाळगल्याचे चार गुन्हे दाखल आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेली दोन पिस्तुले ही यापूर्वी अटक करण्यात आलेले अजय काळभोर व तिरुपती ऊर्फ बाब्या जाधव यांनी दिलेली असून ही हत्यारे उमरठी मध्यप्रदेश येथुन त्याच्या पुण्यातील ओळखीच्या लोकांना विक्री करुन पैसे कमवत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे . 

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवाडी, सहा.पोलिस निरीक्षक गणेश पवार व कर्मचारी राजू मोरे, भालचंद्र बोरकर, निलेश शिवतरे, किरण चोरगे, अतुल मेंगे, तानाजी गाडे, राजनारायम देशमुख, प्रदीप शेलार, नवनाथ चांदणे, शितल शिंदे यांच्या पथकाने केली.