गिरीश महाजनांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण मागे

0
497

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मराठा आरक्षणासाठी गेल्या १६ दिवसांपासून आझाद मैदानात उपोषण करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचे आज (शनिवार) जाहीर केले. १० दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी यावेळी  दिला.