Maharashtra

गिरीश बापट यांचा आमदारकीचा राजीनामा

By PCB Author

June 05, 2019

मुंबई, दि. ५ (पीसीबी) –  पुण्याचे खासदार  गिरीश बापट यांना आपल्या आमदार  पदाचा राजीनामा दिला आहे. गिरीश बापट यांनी पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती.  खासदार झाल्याने त्यांनी आपल्या विधानसभा सदस्य पदाचा आज (बुधवार)  राजीनामा दिला आहे.   

गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री होते. लोकसभा  निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदार मोहन जोशी यांचा पराभव केला. बापट हे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री होते. तसेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये संसदीय मंत्री होते.

दरम्यान,  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विखे-पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विखे-पाटील यांच्या प्रवेशाला दुजोरा दिला आहे. त्यांचा प्रवेश  आता लगेच होणार असल्याचे सांगितले जात आहे.