गावाकडची माणसं” ग्रामीण जीवनावरील पुस्तकाचे जेष्ठ साहित्यीक गोविंद गोडबोले यांच्या हस्ते प्रकाशन

899

पिंपरी, दि.३ (पीसीबी) – सध्याच्या धावपळीच्या जगात वाचन संस्कृती मागे पडत आहे. युवापिढी सोशल मीडियाच्या वापरात गर्क झाली आहे,अशा परिस्थितीत,”आम्ही कोल्हापुरी” या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न होत आहे,

लेखनाची आवड असणाऱ्या व्यक्तींना या ग्रुपवरून प्रोत्साहन देण्यात येत आहे,यापुढील काळात याची व्याप्ती वाढायला हवी कारण वाचनातूनच खऱ्या अर्थाने जीवनाला समृद्धी प्राप्त होते असे प्रतिपादन साहित्यिक गोविंद गोडबोले यांनी केले..शाम कुंभार यांनी लिहलेल्या “गावाकडची माणसं” या पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर येथील हॉटेल कोहिनूर स्क्वेअर येथे,मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी ते बोलत होते,सध्यस्थीतीत लेखन कला जोपासण्याकडे कोणीही लक्ष देत नाही असे असताना,शाम कुंभार यांनी गावकडकच्या आठवणींना उजाळा देत,”गावाकडची माणसं” या पुस्तकाचे लेखन केले,या पुस्तकाने प्रत्येकाला आपला भूतकाळ आठवण्याची संधी दिली आहे, शिवाजी विद्यापिठाचे इंग्रजी विभाग प्रमुख,व सिनेट मेंबर प्राध्यापक नामदेव खवरे यावेळी म्हणाले, ग्रामीण भाषेत केलेल्या लेखनाने या पुस्तकाचे,साहित्य क्षेत्रात वजन वाढणार आहे,या पुस्तकाचे इतर भाषेत भाषांतर करायला हवे असे डॉक्टर खवरे यांनी याप्रसंगी मत व्यक्त केले या कार्यक्रमास साहित्यिक बाबा जाधव,वास्तू प्रॉपर्टीचे चेअरमन दिपक देसाई,अनिल धडाम संतोष कोईगडे,सरपंच राजू चव्हाण,प्रा. रवींद्र खैरे, प्रा.विजय कुंभार,प्रज्ञा कुंभार,व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वागत नामदेव कुंभार यांनी तर प्रास्ताविक रवींद्र खैरे यांनी केले प्रदीप बोभाटे यांनी सूत्रसंचलन केले व के डी कुंभार यांनी सर्वांचे आभार मानले