Pimpri

गाडी खरेदीच्या बहाण्याने नागरिकाची 4 लाख रुपयांची फसवणूक

By PCB Author

April 23, 2024

ऑनलाईन गाडी विक्री करत असताना नागरिकाची तब्बल 4 लाख रुपयांचीफसवणूक केली आहे. हा प्रकार 1 जिसेंबर 2023 ते 22 एप्रिल 2024 या कालावधीत काळेवाडी येथील ड्रीम्स कार शोरूम येथे घडली आहे,

याप्रकरणी गजानन रुस्तुमराव ढोरे (वय 41 रा.वसमत, हिंगोली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.22) फिर्याद दिली आहे,यावरून अजित कुलाळ (वय 50), शुभम पाटील (वय 35), संदिप काकडे (वय 45), रविंद्र राठोड (वय 35) एक महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची वोक्स वॅगन ही कार ओएलएक्सवर विक्रीसाठी काढली होती. यावेळी आरोपींनी जाहिरात पाहून ड्रीम्स कार काळेवाडी फाटा येथून एजंट यांनी फिर्यादिशी संपर्क साधला. यावेळी फिर्यादि ला बोलणी करून गाडी 4 लाख 20 हजार रुपयांना द्यायचे ठरले. त्यासाठी 10 हजार रुपये ऑनलाईन पाठवले. उर्वरित रक्कम चेकवर देण्याचा बहाणा करून चेकवर बदलेली सही दिली. ज्यामुळे चेक बँकेत वटला नाही. फिर्यादींची 4 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली असून फिर्यादींनी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.