गांधी पेठ तालीमला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीचे मॅट

0
311

चिंचवड, दि. 24 (पीसीबी): गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधीतून गांधी पेठ तालीम चिंचवड, येथे पाच लक्ष रुपयाचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीचे मॅटचा लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी गांधी पेठ तालमीचे विश्वस्त माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, पालिकेचे सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, भारतीय जनता पार्टी चिंचवड मंडलाचे अध्यक्ष योगेश चिंचवडे, गांधी पेठ तालमीचे पैलवान विपुल नेवाळे स्वीकृत नगरसेवक बिभीषण चौधरी, प्रसिद्ध उद्योजक संतोष कलाटे, टेल्को एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर शेडगे उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी निरोगी आयुष्याचा मंत्र म्हणून खेळाला खूप महत्त्व आहे, सर्वात जास्त खेळात ताकद लागते ते म्हणजे कुस्ती. कुस्तीचा खेळाडू हा ताकदवान असला तरी सर्वात जास्त विनम्र असतो. तीच विनम्रता त्याला खेळाच्या माध्यमातून शारीरिक ऊर्जा देते आणि ध्यानाच्या माध्यमातून मानसिक ऊर्जा देण्यास मदत करते.  देशी असलेल्या कुस्ती या खेळाचे महत्त्व  सांगताना बलशाली शरीर आणि मन या दोघांचा उपयोग आपले संपूर्ण आयुष्य आरोग्यदायी जपताना नक्की होतो.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती मॅटचे लोकार्पण करताना उपस्थित सर्व गांधी पेठ तालमीतील मल्ल यांना शारीरिक परिश्रम करताना शरीर बळकट व पीळदार होते.  त्याचबरोबर आपले सुंदर आणि चांगले व्यक्तिमत्वही निर्माण करण्याचा मंत्र दिला. कुस्तीच्या मॅटचे उद्घाटन गांधी पेठ तालीमच्या  दोन नव कुस्तीगारांची कुस्ती लावून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे व समारोप व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर शेडगे यांनी केले.