Pune Gramin

गहुंजेत क्रिकेट मँच हारल्याच्या रागातून एकाला बँटने जबर मारहाण

By PCB Author

February 10, 2019

तळेगाव, दि. १० (पीसीबी) – क्रिकेट मँच हारल्याच्या रागातून चार जणांनी मिळून एका तरुणाला बँटने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना गहुंजे गावच्या हद्दीतील व्हीडीआर स्पोर्टस अॅकॅडमीच्या मैदानावर घडली.

प्रमोद अर्जुन शेळके (वय ३२, रा. शैलेश सोनार आनंदनगर प्लँट नं एच २०६, आंबेठाण चौक, चाकण) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश शेलार आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी प्रमोद आणि टिमने आरोपींसोबत २६ जानेवारी रोजी गहुंजे गावच्या हद्दीतील व्हीडीआर स्पोर्टस अॅकॅडमीच्या मैदानावर एकमेकांसोबत क्रिकेट मँच लावली होती. यावेळी गणेश शेलार आणि टिमने ही मॅच हारली. याचा राग मनात धरुन गणेश शेलार आणि त्याच्या तिघा साथीदारांनी मिळून प्रमोद याला बँटने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. या घटनेत प्रमोद याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर इजा झाली आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक हिवरकर अधिक तपास करत आहेत.