Pune Gramin

गहुंजेत अज्ञाताचा खून करुन मृतदेह पवना नदीत फेकला

By PCB Author

April 16, 2019

गहुंजे, दि. १६ (पीसीबी) – एका अज्ञात पुरुषाचा धारदार हत्याराने खून करुन मृतदेह गहुंजे येथील पवना नदीत फेकून दिल्याचे समोर आले आहे. ही घटना सोमवार (दि.१५) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गहुंजे येथील पवना नदीत अज्ञात पुरुषाचा धारदार हत्यारांनी खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याची माहिती तळेगाव पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने घटना स्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मयताचे वय अंदाजे ३५ ते ४० आहे. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस निरीक्षक पवार अधिक तपास करत आहेत.