Maharashtra

गर्दी कमी केली नाही तर लोकल बंद करावी लागेल राजेश टोपेंचा इशारा

By PCB Author

March 18, 2020

मुंबई, दि.१८ (पीसीबी) – लोकांनी गर्दी कमी केली नाही तर मुंबई लोकल बंद करावी लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. महाराष्ट्रात एकूण ८०० जणांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ४२ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. उर्वरित सर्व निगेटिव्ह आहेत असंही यावेळी त्यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा बंद करणार नाही आहोत असे यावेळी त्यांनी सांगितले. राज्यात आणखी काही लॅब, हॉस्पिटल सुरु करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.