गर्दी ओसरली नाही तर आम्हाला नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावा लागेल – मुख्यमंत्री

0
559
मुंबई, दि.१८ (पीसीबी) – राज्य सरकारने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही निर्बंध आणण्यासाठी आज बैठक पार पडली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही रेल्वे आणि बस बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र जनतेने अनावश्यक प्रवास टाळावा. गर्दी ओसरली नाही तर मग आम्हाला नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावा लागेल. तरी महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, अनेक ठिकाणी लोकांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळलेला आहे”, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
सकीय कार्यालयांना सात दिवसांसाठी सुट्टी देण्यात आली, असे सांगण्यात आले होते. मात्र सात दिवस सुट्टी नसून ५० – ५० टक्के कर्मचारी बोलवून काम करावे का? याची चाचपणी आम्ही करत असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.