Pune Gramin

गणेश विसर्जना दरम्यान इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

By PCB Author

September 24, 2018

देहुगाव, दि. २४ (पीसीबी) – गणेश विसर्जना दरम्यान देहुगावातील इंद्रायणी नदीत बुडून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास घडली.

संदीप साळुंखे असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी गणेश विसर्जना दरम्यान एक तरुण देहुगावातील इंद्रायणी नदीत बुडाला असल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच  एनडीआरएफच्या जवानांनी संदीप याचा तीन तास शोध घेऊन पाण्याबाहेर काढले. त्याला त्वरित उपचारासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.