Banner News

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वाहतुक व्यवस्थेत बदल

By PCB Author

September 11, 2019

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – गुरुवारी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. हे बदल विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत असणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिले आहेत.

वाहतूक विभागनिहाय करण्यात आलेले बदल पुढील प्रमाणे:

हिंजवडी वाहतूक विभाग

१. मेझा – ९ हॉटेल चौक

मेझा – ९ हॉटेल चौक मार्गे शिवाजी चौकाकडे जाणा-या वाहनांनी मेझा – 9 हॉटेल येथून डावीकडे वळून लक्ष्मी चौकातून इच्छित स्थळी जावे

२. कस्तुरी चौक

कस्तुरी चौक मार्गे हिंजवडीकडे जाणा-या वाहनांनी कस्तुरी चौकातून डावीकडे वळून इंडियन ऑइल पेट्रोल पंप चौक अथवा उजवीकडे वळून विनोदेवस्ती चौक मार्गे इच्छित स्थळी जावे

 

निगडी वाहतूक विभाग

१. खंडोबामाळ –

खंडोबामाळ चौकाकडून चिंचवड चाफेकर चौकाकडे जाणारी वाहतूक दळवीनगरमार्गे बंद असेल. ही वाहतूक म्हळसांकात चौक, बिजलीनगर उड्डाणपूलावरून चिंचवडकडे जाईल

 

२. हुतात्मा चौक –

* केसदन चौकाकडुन हुतात्मा चौकाकडे येणारी वाहतूक आकुर्डी स्टेशन मार्गे जाईल

* बिग इंडिया चौकाकडून हुतात्मा चौकाकडे येणारी वाहतूक भेळ चौकमार्गे वळविण्यात येणार आहे

* आकुर्डी पोलीस चौकीकडून हुतात्मा चौकाकडे येणारी वाहतूक आकुर्डी स्टेशन मार्गे वळविण्यात येणार आहे

 

 

३. हँगिंग ब्रिज –

* धर्मराज चौकाकडून हँगिंग ब्रिजकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक भोंडवे चौक भोंडवे कॉर्नरमार्गे सुरू असेल

* डांगे चौकाकडून हँगिंग ब्रिजकडे येणारी वाहतूक ताथवडे मार्गे वळविण्यात येणार आहे

 

पिंपरी वाहतूक विभाग

१.शगुन चौक

पिंपरी पुलाजवळ शगुन चौकाकडे येणारी वाहतूक उजवीकडे वळवून भाटनगरमार्गे चिंचवडकडे सुरू असेल

२.डिलक्स चौक व कराची चौक

काळेवाडी पुलावरून येणारी वाहने – काळेवाडी स्माशानभुमी चौकातून उजवीकडे वळून जमतानी चौक- डेअरी फार्म मार्गे मुंबई पुणे हायवेकडे जातील

३.पिंपरी कॅम्प

पिंपरी चौकातून गोकुळ हॉटेलकडे वाहतूक बंद असेल. ही वाहने सर्व्हिस रोडने वल्लभनगर मार्गे नाशिक फाट्याकडे (जुना पुणे-मुंबई महामार्ग) जातील

 

दिघी-आळंदी वाहतूक विभाग

१.योगीराज चौक

दिघीकडून येणारी वाहतूक योगीराज व चाकण चौकाकडे न वळवता देहूफाटा येथून मोशी मार्गे वळविण्यात येईल

२. चाकण चौक

चाकण चौकात येणारी वाहतूक केळगाव चौकातून पुढे जाईल

३.केळगाव चौक

आळंदी फाटा येथून जड वाहनांना प्रवेश बंद असेल. केळगाव चौक येथे येणारी वाहने गाथा मंदिर मार्गे डुडूळगाव चौक व तेथून इच्छित स्थळी जातील

 

४.धानोरा फाटा

मरकळकडून येणारी वाहतूक आळंदीकडे न येता धानोरा फाटा येथून च-होली फाटा मार्गे सुरू राहील

५.च-होली फाटा

दिघीकडून मरकळ व वडगावकडे जाणारी वाहतूक देहूफाट्याकडे न जाता च-होली चौकाकडून धानोरा मार्गे सुरू राहील