Maharashtra

गणेशोत्सवादरम्यान डिजे लावणारच; उद्यनराजेंच्या आवाहनाला विश्वास नांगरे-पाटलांची तंबी

By PCB Author

September 12, 2018

सातारा, दि. १२ (पीसीबी) – साताऱ्याचे खासदार उद्यनराजे भोसले यांनी दणक्यात गणेशोत्सव साजरा करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. गणेशोत्सवादरम्यान डिजे लावणारच असे सांगत उद्यनराजेंनी कायदा मोडण्याची भाषा केली आहे. गणपती आगमन सोहळ्यामध्ये त्यांनी कायद्याची भिती न ठेवता डीजे लावण्याचा आदेशच आपल्या कार्यकर्त्यांना दिला.   

उद्यनराजे यांनी आपल्या स्टाइलमध्ये डायलॉगबाजी करत  ‘जब तक हैं जान तब तक डॉल्बी रहेगी’ असे म्हटले. तर यावर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस  महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी काद्याचा आदर सर्वांनी करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी न्यायालय आणि पोलिसांच्या आदेशाचे पालन करुन कायदयाचा आदर करावा, कुठेही डॉल्बी लावू देणार नाही अशी तंबीही त्यांनी दिली आहे.

सातारा शहरामध्ये एका गणपती आगमनावेळी उद्यनराजेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी डॉल्बी लागलीच पाहिजे असे मत व्यक्त केले. २३ तारखेला विसर्जन आहे, तेव्हा पाहू काय होते आणि काय नाही होते. आणि कसे नाही होत. डॉल्बी लागलीच पाहिजे,  डेसीबल ठरवणारे न्यायालय आणि पोलिस खाते कोण? असा सवाल त्यांनी यावेळी केला.