Pimpri

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात १६६९ कर्मचारी वर्ग

By PCB Author

September 13, 2018

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – गणेशोत्सवाचा मुहूर्त गाठत पुणे पोलीस आयुक्तालयातून आज (गुरुवार) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये फौजदार, शिपाई, नाईक आणि हवालदार असे एकूण १६६९ कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. १५ ऑगस्ट रोजी सुरु झालेले पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयमध्ये मनुष्यबळ अपुरे असल्याने बऱ्याचशा अडचणींना पोलिसांना समोरे जावे लागत होतो. मात्र या वर्गीकरणानंतर डबल ड्युटी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा स्वास घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन करताना पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून १८५५ तर पुणे ग्रामीणकडून ३५२ जणांचे मनुष्यबळ पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग करण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र या प्रक्रियेला तब्बल एक महिना लागला असून पुणे पोलीस आयुक्तालयातून आज पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये सहायक फौजदार १४३, पोलीस हवालदार ३७५, पोलीस नाईक ४२० आणि पोलीस शिपाई ७३१ असे एकूण १६६९ जणांचे वर्गीकरण करण्यात आले. यामुळे आता कामाला गती मिळण्याबरोबरच गुन्हेगारीवर आळा बसेल का यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.