Maharashtra

गणेशा माझाच मुलगा; सोफिया हयातचे वादग्रस्त विधान

By PCB Author

September 20, 2018

मुंबई, दि. २० (पीसीबी) – सर्वांचे आराध्य दैवत असलेला गणेशा हा माझाच मुलगा आहे. प्रत्येक आईला तिचा मुलगा प्रिय असतो, तसाच मलाही माझा मुलगा श्रीगणेशा प्रिय आहे. तो केवळ गणेशच नाही, तर आल्लाहचे एक रुप आहे’, असे वादग्रस्त कॅप्शन ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक आणि मॉडेल सोफिया हयात हिने एका फोटोला दिले आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  

सोफियाने काही दिवसापूर्वी गणपती बाप्पाबरोबर एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला सोफियाने दिलेल्या कॅप्शनमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.  सोफियाने हा फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी  तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काही नेटकऱ्यांनी तिला मानसिक स्वास्थ खालावले आहे का ? असा प्रश्नही विचारला आहे. तर काहींनी तिला मुर्ख ठरवले आहे.

दरम्यान, सोफिया यापूर्वी काही वादग्रस्त विधानामुळे चर्चेत  आली होती. त्यामुळे सोशल मीडियावरही तिच्यावर अनेक वेळा नेटकऱ्यांकडून टीकास्त्र सोडले आहे. आता पुन्हा तिने वादग्रस्त कॅप्शन फोटोला दिल्याने वाद ओढवून घेतला आहे.