“गणपती बाप्पा म्हणतो तुला आशीर्वाद दिले, झालास ना तू मंत्री, पुढे काय?”

0
440

रत्नागिरी,दि.१७(पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज त्यांनी गणपतीपुळ्याला भेट दिली. यावेळी “गणपती बाप्पा म्हणतो तुला आशीर्वाद दिले, झालास ना तू मुख्यमंत्री? झालात ना तुम्ही मंत्री, पुढे काय? आशीर्वाद मिळवून तुम्हाला पदावरती बसवलं. जनता म्हणजे माझा आशीर्वीद आहे, असं गणपती बाप्पा सांगतोय”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी कोकणातील लोकप्रतिनिधींना गणपतीपुळ्याचा विकास करण्याचे आवाहन केले.

यावेळी तेथील लोकप्रतिनिधींना आणि स्थानिक नागरिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे उदाहरण दिले. गणपती बाप्पा म्हणतो तुला आशीर्वाद दिले, झालास ना तू मुख्यमंत्री? झालात ना तुम्ही मंत्री, पुढे काय? आशीर्वाद मिळवून तुम्हाला पदावरती बसवलं. जनता म्हणजे माझा आशीर्वीद आहे, असं गणपती बाप्पा सांगतोय. पदावर बसवल्यानंतर ज्या एका उद्देशाने जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे ते व्हायला हवं. देव कुठे बघायचा? हा ज्याचात्याचा प्रश्न आहे.

मी तर म्हणेल, तो गणपती बाप्पा आहे, त्याचे जिवंत रुप माझ्यासमोर बसलेलं आहे. जनता आपल्याला आशीर्वाद देते आणि आपल्याला इथपर्यंत बसवते. मग त्यांच्या आयुष्यामध्ये सुखासमाधानाचे दोन-चार क्षण आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यासाठी निधीची चिंता करु नका, मी बसलो आहे. आराखडा बनवायला सुरुवात करा. मी तुम्हाला हात मोकळे करुन देतो, असं आश्वासन सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल.

दरम्यान, काही दिवस निघून गेले आणि एक दिवस अंबरनाथ महोत्सवाचं आमंत्रण घेऊन आला. तिथे गेल्यानंतर माझा विश्वास बसेना की हेच ते ठिकाण जे काही दिवसांपूर्वी अस्वच्छ असल्यामुळे मला त्याठिकाणी जाऊ नये, असं वाटत होतं. त्याभागाचा श्रीकांत शिंदे यांनी कायापालट केला होता.