‘गडचिरोलीच काय, घरात बसेन’ पण… ; पोलीस उपअधीक्षकांचे आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटलांना प्रत्युत्तर  

0
1535

कोल्हापूर, दि. १० (पीसीबी) – कोल्हापूर महापालिकेच्या महापौर, उपमहापौर यांची आज (सोमवार)  निवड करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला   आहे. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यामध्ये शाब्दीक खटके उडाले. ‘गडचिरोलीच काय,  घरात बसेन, मात्र तुम्हाला आत सोडणार नाही,’ अशा शब्दात गुरव यांनी मुश्रीफ आणि पाटील यांना प्रत्युत्तर दिले.

नगरसेवकांना मतदानासाठी आता सोडताना त्यांची गेटवर ओळखपत्र तपासणी उपअधीक्षक सुरज गुरव करत होते. त्याला आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी हरकत घेतली. त्यामुळे संतापलेल्या या दोन्ही नेत्यांनी गुरव यांना गडचिरोलीची हवा दाखवण्याचा इशारा दिला. मात्र, या धमकीला भीक न घालता गुरव यांनी, ‘गडचिरोलीच काय पण घरात बसेन, मात्र तुम्हाला आत सोडणार नाही, असे उत्तर दिले. त्यामुळे येथील वातावरण काही काळ  तणावपूर्ण बनले होते.

महापालिका प्रवेश द्वारावर ओळख पत्र तपासण्याचे काम पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव करत होते. मात्र त्याला आमदार मुश्रीफ आणि आमदार पाटील यांनी हरकत घेतली. महापालिकेत प्रवेश द्या तेथील यंत्रणा तपासण्याचे काम करेल, असे त्यांनी सांगितले. मात्र, गुरव यांनी तसे करण्यास नकार दिला. यावरून दोन्ही आमदार व गुरव यांच्यात वादावादी झाली.