गटारे आणि शौचालय साफ करण्यासाठी खासदार झाले नाही; साध्वी प्रज्ञाचे बेताल वक्तव्य

0
360

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – गटारे आणि शौचालय साफ करण्यासाठी मी खासदार झालेले नाही असे वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. अनेकदा बेताल वक्तव्य करुन वाद निर्माण करणाऱ्या साध्वी प्रज्ञा या त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत येऊ शकतात. कारण त्यांनी शौचालय आणि गटारे साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही असे म्हणत एक प्रकारे स्वच्छ भारत अभियानाची खिल्ली उडवली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन संताप व्यक्त होताना दिसतो आहे.

शौचालय आणि गटारे साफ करण्यासाठी खासदार म्हणून निवडून आले नाही आम्हाला ज्या कामासाठी निवडून दिले गेले आहे ते काम आम्ही इमानदारीत करु अस त्यांनी म्हटले आहे. मात्र यात त्यांची बोलण्याची पद्धत अनेकांना खटकली आहे. सोहोर या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यासंदर्भातला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून साध्वी प्रज्ञा यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. तुम्हाला स्वच्छता करायची नाही तर करु नका पण असे शब्द वापरुन विरोधकांना मोदी सरकारवर टीकेची संधी देऊ नका असे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. तुम्ही आम्हाला मूर्ख बनवण्यासाठी खासदार झाला आहात का? असाही प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारला आहे.