गजानन महाराज ट्रस्ट अध्यक्षपदी रामभाऊ पिसे यांची निवड

0
223

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – निगडी प्राधिकरण येथील श्री गजानन महाराज मंदिर पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी रामभाऊ पिसे यांची एक मताने निवड करण्यात आली आहे. सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीचे निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी भाऊराव खडसे व रविंद्र मिरजी, सचिव देविदास हरमकर. सहसचिव सुरेश गुळवे, सचिन राडे व खजिनदारपदी महादेव कथले यांची निवड करण्यात आली. सर्व सभासदांच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

प्राधिकरणात १९८४ मध्ये गजानन महाराज मंदिराची उभारणी करण्यात आली. तेव्हा पासून दरवर्षी विविध उत्सव, सण, सोहळे प्रतिष्ठानच्या वतीने साजरे केले जातात.
महाराजांची प्राणप्रतिष्ठा, मंदिराचा वर्धापनदिन, श्रावणात महिनाभर ग्रंथवाचन, गाथा व ज्ञानेश्वारी पारायण तसेच दर गुरुवारी सुमारे एक हजार भाविकांना महाप्रसाद आदी उपक्रम राबविले जातात. प्रकटदिनाला ३०-३५ हजार भाविकांना महाप्रसाद हे या प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य आहे, असे नवनियुक्त अध्यक्ष रामभाऊ पिसे यांनी सांगितले.