Banner News

गजानन चिंचवडे यांच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

By PCB Author

February 06, 2022

पिंपरी, दि. ६ (पीसीबी): फसवणुकीबाबत खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केली. तसेच मानसिक त्रास देऊन भाजपचे नेते गजानन चिंचवडे यांच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात शनिवारी (दि. ५) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पोलिस २० लाख रुपये मागत होते आणि त्यांच्या टेन्शन मुळे चिंचवडे गेल्याचा गंभीर आरोप केला आहे.

गजानन पोपटराव चिंचवडे (वय ५३, रा. चिंचवडगाव) यांचे गुरुवारी (दि. ५) निधन झाले. त्यांच्या पत्नी नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे (वय ४५) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार शकुंतला बाळू चिंचवडे, दिनेश बाळू चिंचवडे, राजेश बाळू चिंचवडे, महेश उर्फ सुनील बाळू चिंचवडे, ओंकार महेश चिंचवडे, संकेत दिनेश चिंचवडे, वंदना दिनेश चिंचवडे, पूनम महेश चिंचवडे तसेच राजेश चिंचवडे यांची पत्नी (सर्व रा. चिंचवडगाव) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी २५ जानेवारीला गजानन चिंचवडे यांच्या विरोधात फसवणुकीचा खोटा गुन्हा दाखल केला. बदनामी करून मानसिक त्रास देऊन गजानन चिंचवडे यांच्या मरणास कारणीभूत झाले, असे फिर्यादीत नमूद आहे.