Pimpri

गंधर्व हॉलमध्ये वारकऱ्यांसाठी मोफत औषधे व आरोग्य सेवा पुरविण्याचा उपक्रम रावबिला

By PCB Author

July 04, 2018

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – मधुकर बच्चे युवा मंच, चैतन्य मेडिको आणि कर्तव्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने वारकऱ्यांसाठी मोफत औषधे देण्याचा कार्यक्रम व वारीतील आरोग्य सेवा पुरविण्याचा उपक्रम गंधर्व हॉलमध्ये राबवण्यात आला.

दरवर्षी फाऊंडेशनच्या वतीने आषाढीवारी पंढरपूर पायी पालखी सोहळ्यातील भाविकांसाठी मोफत आरोग्य सेवा आणि औषधे दिली जातात. राज्यमंत्री सचिन पटवर्धन यांच्या हस्ते व मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने यंदाही हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

यावेळी नगरसेवक सुरेश भोईर, देविदास पाटील, मुकुंद गुरव, भाजपा सरचिटणीस अजित कुलथे,  सांस्कृतीक अध्यक्ष धनंजय शाळीग्राम, पुणे जिल्हा रोजगार आघाडी अध्यक्ष सौरभ शिंदे, प्रभाग अध्यक्ष गणेश बच्चे, अभिजित पाटील, मनोज तोरडमल, विनय शिरदाळे, दिलीप खैरे, जय वानखेडे, भटू महाले, पुजारी विजय, गणेश क्षीरसागर, सचिन वाघमारे, सौरभ कर्णवट, सदाशिव पाटील, विनय जरदाळे, तुकाराम वाव्हळकर, संभाजी पाटील, रणजित रासकर आदी उपस्थित होते. तर मारुती हाके यांनी सर्वांचे आभार मानले.