गंज पेठेत अज्ञातांनी ५ दुचाक्या जाळल्या

0
752

पुणे, दि. १३ (पीसीबी) – गंज पेठ परिसरात एका नाल्याजवळ पार्क केलेल्या ५ दुचाकी अज्ञातांनी जाळल्याचे समोर आले आहे. हा प्रकार आज (गुरुवार) पहाटे तीनच्या सुमारास उघडकीस आला.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे तीनच्या सुमारास दुचाकींना आग लागल्याची माहिती कॉलद्वारे अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर तातडीने गंज पेठ विभागाची अग्निशमन दलाची गाडी रवाना करण्यात आली. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या काही दुचाकी जळताना दिसत होत्या. या गाड्यातील पेट्रोलमुळे आग अधिक भडकत होती. त्यानंतर जवानांच्या मदतीने काही मिनिटात ही आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु पाचही दुचाक्या जळून खाक झाल्या होत्या. खडक पोलीस अधिक तपास करत आहेत.