गंगेत वाहून येत असलेले मृतदेह हे भारतातील नसून ते नायजेरियाचे

0
390

मुंबई, दि. १५ (पीसीबी) : आपल्या बेताल वक्तव्यांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. गंगेत वाहून येत असलेले मृतदेह हे भारतातील नसून ते नायजेरियाचे असल्याचा जावईशोध कंगनाने लावला आहे. कंगनाच्या या अजब तर्कटावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
कंगना रनौतला ट्विटरवर बॅन करण्यात आल्याने ती इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली आहे. नुकतीच तिने चाहत्यांना ईद आणि अक्षय तृतियाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तसेच सर्वांनी एकत्र राहून कोरोनाविरुद्धची लढाई लढण्याचं आवाहनही केलं आहे. तिने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यातून तिने हे आवाहन केलं आहे.

तरीही इस्रायल लढतोय
जग अनेक गोष्टींशी सामना करताना दिसत आहे. कोरोना असो की अन्य काही देशांचा संघर्ष सुरू आहे. चांगल्या काळात संयम घालवता कामा नये आणि वाईट काळात हिंमत गमावता कामा नये. आपल्याला यातून काय शिकायला मिळतंय? आता इस्रायलचंच पाहा. काही लाख लोक या देशात आहेत. पण सहा सात देश त्यांच्यावर हल्ला करत आहेत. तरीही हा एकटा देश त्यांच्याविरोधात लढत आहे, असं कंगनाने म्हटलं आहे. त्या देशात असं काय आहे? तुम्ही स्ट्राईक केलीय आम्ही त्याला जुमानत नाही, असं युद्धात उभं राहून कोणी बोलत नाही. अशा प्रकारची घाणेरडी वृत्ती तिथे नाहीये. काही लोक नुसती गंमत बघतात. आनंद लुटतात. आता कोरोना काळात एखादी महिला रस्त्यावर बसून ऑक्सिजन घेत आहे आणि ही बातमी इंटरनॅशनल लेव्हलला व्हायरल होते. आणि मग नंतर माहीत पडतं की हे चित्रं कोरोना काळातील नाही, असं कंगनाने म्हटलं आहे.

विरोध करायचा नाही का?
आता काल जे फोटो व्हायरल झाले, ते गंगा नदीचे असल्याचं सांगितलं जातं. मात्र, ते फोटो गंगेचे नसून नायजेरियाचे आहेत. अशा फोटोंचा आपण विरोध करायचा नाही का?, असा सवाल कंगनाने केला आहे.