गंगेच्या किनारी आढळले ११४० किमीमध्ये २ हजाराहून अधिक मृतदेह

0
378

उत्तरप्रदेश,दि.१५(पीसीबी) – दैनिक भास्करच्या 30 पत्रकारांनी बिजनौर, मेरठ, मुझफ्फरनगर, बुलंदशहर, हापूर, अलीगड, कासगंज, संभल, अमरोहा, बदनयू, शाहजहांपूर, हरदोई, फर्रुखाबाद, कन्नौज, कानपूर, उन्नाव, रायबरेली, फतेहपूर, प्रयागराज, प्रतापगढ, प्रतापगढ, प्रतापगढ , प्रतापगड वाराणसी, चांदौली, गाझीपूर आणि बलिया मधील गंगेच्या काठावरील घाटांना आणि गावांना भेटी दिल्या. गंगा उत्तर प्रदेशातील ‘या’ जिल्ह्यांतून 1140 किलोमीटरचा प्रवास करत बिहारमध्ये प्रवेश करते. दरम्यान, सध्या यामुळे कानपूर, कन्नौज, उन्नाव, गाझीपूर आणि बलियामधील परिस्थिती अतिशय वाईट आहे. तर उर्वरित जिल्ह्यांतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समोर आले.

उत्तर प्रदेशातील बड्या शहरांपैकी एक कानपूरमधील शेरेश्वर घाटाजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर अनेक मृतदेह पुरण्यात आले आहेत. भास्करच्या पत्रकारांनी स्वत: याचा तपास केला असून येथील परिस्थिती खूपच भयावह असल्याचे सांगितले आहे. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त मृतदेहांना जमिनीत पुरलेले दिसत होते. काही मृतदेहांचे कुत्रे लचके तोडत होते तर काहींवर गरुड व कावळे बसलेले दिसले. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांची टीमही येथे पोहोचली. त्यानंतर पोलिसांकडून प्रत्येक मृतदेहावर माती टाकण्याचे काम सुरू झाले.

कोरोनाकाळातील सर्वात मोठी स्मशानभूमी उन्नावमध्ये असल्याचे दिसून येत आहे. कारण येथीलच शुक्लगंज घाट आणि बक्सर घाटाजवळ 900 हून अधिक मृतदेहांचे दफन करण्यात आले आहे. दैनिक भास्करच्या पत्रकाराने या दोन्ही ठिकाणी तपास केला. दरम्यान, तेथे प्रत्येक चरणात मानवी अवयव विखुरलेले दिसतात. दैनिक भास्करच्या स्पष्टीकरणानंतर प्रशासन झोपेतून जागा झाला आणि घाईगडबडीने सर्व मृतदेहांना वाळूत पुरुन टाकले.