Desh

गंगा नदी वाचवण्यासाठी उपोषणाला बसलेले प्राध्यापक जी.डी.अग्रवाल यांचे निधन

By PCB Author

October 11, 2018

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – गंगा नदी वाचवण्यासाठी गेल्या १११ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले कानपूर आयआयटीचे माजी प्राध्यापक जी.डी.अग्रवाल यांचे आज (गुरुवारी) ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अग्रवाल यांनी गंगा नदीसाठी आपले संपूर्ण आयुष्यभऱ खस्ता खाल्या आहेत.  

गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकारने कोणतीही दखल न घेतल्याच्या निषेधार्थ अग्रवाल आमरण उपोषणाला बसले होते. ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्येत ढासळल्यामुळे रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केले होते.

आयुष्याच्या उत्तरार्धात अग्रवाल यांनी स्वामी ग्यान स्वरुप सानंद असे नाव धारण केले. २०१२ साली सुद्धा ते गंगा नदीसाठी उपोषणाला बसले होते. त्यावेळी तत्कालिन मनमोहन सिंग सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यावेळी सुद्धा त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथून दिल्लीला आणण्यात आले होते.